प्रतिनिधी / पणजी
रामनगर-बेती येथील श्री राम मंदिराचा 22 वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार 11 ते रविवार 13 मार्चपर्यंत श्री रामनगर सांस्कृतिक मंडळातर्फे साजरा होणार आहे.
शुक्रवार 11 रोजी संध्याकाळी 6 वाजता राक्षोहन हवन श्री व सौ. विजेश्री शिवाजी निळू भाईप व अमिता शशांक नाईक चोडणकर यांच्या यजमानपदाखाली होईल.
शनिवार 12 रोजी सकाळी 8 वाजता गणेश पूजन, पुण्याहवाचन, पुनःकलश प्रतिष्ठापना, हवन व अन्य धार्मिक विधी श्री व सौ. विजेश्री शिवाजी निळू भाईप व अमिता शशांक नाईक चोडणकर यांच्या यजमानपदाखाली होईल.
संध्याकाळी 7.30 वाजता आरती, तद्नंतर तीर्थप्रसाद, रात्री 8 वाजता साई नाटय़मंडळ, पिळर्णतर्फे सुमित श्रीपाद शिरोडकर दिग्दर्शित ‘पोरान केलो मोग बापायन काडलो फोग’ विनोदी कोकणी नाटय़प्रयोग श्री साई नाटय़ मंडळ, पिळर्णतर्फे होईल. यात सत्यविजय फोंडेकर, रोहन कुडाळकर, दिशांत तामोस्कर, मयूरेश तामोस्कर, सुमित शिरोडकर, ध्रुव गोसावी, दीक्षिता शिंदे, विदेश गोसावी, सिद्धांत मांद्रेकर यांच्या भूमिका आहेत. नाटकाचे पुरस्कर्ते रेईसमागुस पंचायतीचे सरपंच केदार नाईक हे आहेत.
रविवार 13 मार्च रोजी श्री व सौ. सुषमा सखाराम तळकटकर यांच्या यजमानपदाखाली सकाळी 8 वाजता श्रीस अभिषेक, 9 वाजता गणेश पूजन, पुण्याहवाचन, पुरुषसुक्त हवन व अन्य धार्मिक विधी, दुपारी 12.30 वाजता महामंगलआरती, तीर्थप्रसाद, पावणी, दुपारी 1 वाजता सुभाष पेडणेकर पुरस्कृत महाप्रसाद, संध्याकाळी 6.30 वाजता महिलांसाठी दिवजांचा कार्यक्रम, रात्री 8 वाजता कला चेतना वळवय राजदीप नायक निर्मित आणि श्रीनिका क्रिएशन नागेशी बांदोडे प्रस्तुत सुशांत नायक लिखित व दिग्दर्शित ‘भिवपाची गरज ना’ कोकणी नाटक होईल. हे नाटक श्रीराम योद्धा स्पोर्ट्स ऍन्ड कल्चरल क्लबतर्फे पुरस्कृत करण्यात आले आहे.
या सोहळय़ाला उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन श्रीराम सीता देवस्थानच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.