वृत्तसंस्था / प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील सुरू असलेल्या ओस्ट्रेव्हा खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी बेलारुसच्या तृतीय मानांकित ऍरीना साबालेन्काने अमेरिकेच्या नवोदित कोको गॉफचा पराभव करत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 12 व्या स्थानावर असलेल्या साबालेन्काने गॉफचा 1-6, 7-5, 7-6 (7-2) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. साबालेन्काला विजयासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. साबालेन्काचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना स्पेनच्या सारा सॉमबेस टोर्मो बरोबर होणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱया एका सामन्यात द्वितीय मानांकित प्लिस्कोव्हाचे आव्हान रशियाच्या कुडेमेटोव्हाने संपुष्टात आणले. या सामन्यात कुडेमेटोव्हाने प्लिस्कोव्हाचा 4-6, 6-4, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.