वृत्तसंस्था / माद्रिद
स्पेनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेनिसपटू राफेल नदालने मॅर्लोका येथे होणघ्ऱया व्यावसायिक गोल्फ स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅलेरिक व्यावसायिक गोल्फ स्पर्धेत विविध देशांचे 60 गोल्फपटू सहभागी होत आहेत. यामध्ये 37 हौशी आणि 23 व्यावसायिक गोल्फपटूंचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात कॅलव्हेया येथे झालेल्या गोल्फ स्पर्धेत नदालने आपला सहभाग दर्शविला होता. नुकत्याच झालेल्या पेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत 34 वर्षीय नदालने सर्बियाच्या जोकोव्हिचचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. नदालने आतापर्यंत 13 वेळा प्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. स्वीसच्या रॉजर फेडररने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एकूण 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत.