खोदानपूर येथील दोघा जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टरमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱया खोदानपूर (ता. कित्तूर) येथील दोघा जणांना गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. चन्नम्मा सर्कलजवळ अबकारी अधिकाऱयांनी ही कारवाई केली असून कॅन्टरसह 8 लाख 73 हजार 192 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केए 22 ए 9915 क्रमांकाच्या कॅन्टरमध्ये पार्टिशन करून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती. अबकारी अधिकाऱयांनी चन्नम्मा सर्कलजवळील गणेश मंदिरानजीक गुरुवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास कॅन्टर अडवून तपासणी केली असता मोठय़ा प्रमाणात दारूसाठा आढळून आला.
नागय्या बसय्या विभुती (वय 33), कुमार इरणगौडा पाटील (वय 26, दोघेही रा. खोदानपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अबकारी विभागाचे अप्परआयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा, अधीक्षक चन्नगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली, लिंगराज के., ए. व्ही. रावळ, सुनील पाटील, बी. एस. अटिगल, ए. डी. जाधव, एम. एफ. कटगेण्णावर, ए. आय. सय्यद व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
कॅन्टरमध्ये पार्टिशन करून 128 बॉक्समधील 1 हजार 152 लिटर गोवा बनावटीची दारू व 19 बॉक्समधील 288 लिटर बिअर अबकारी अधिकाऱयांनी ताब्यात घेतली आहे. यासंबंधी कॅन्टर मालकाविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. अबकारी अधिकारी पुढील तपास करीत आहेत.