वार्ताहर /किणये
बेळवट्टी गावात ग्राम सेवा केंद्राचे उद्घाटन एन. एस. गाडेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. तालुका पंचायत माजी सदस्य एन. के. नलवडे यांनी श्रीफळ वाढविले. या ग्राम वन सेवा केंद्राचा स्थानिक शेतकरी व नागरिकांना उपयोग होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव पाटील, मधू नलवडे, इराप्पा चांदीलकर, परशराम मेदर, मुन्ना कांबळे, नामदेव पाटील, डॉ. अर्जुन पाटील, टोपाण्णा पाटील, गुंडू सुतार आदी उपस्थित होते. जन्मदाखला, मरण उतारा, आधारकार्ड, सात-बारा उतारा, रेशनकार्ड आदी सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत, असे प्रमुख पाहुण्यांनी सांगितले.