ब्लिंक इट- बोट एकत्रः मुंबई, बेंगळूर शहरात सेवा लवकरच
वृत्तसंस्था/ चेन्नई
इयरफोनसह विविध ऍक्सेसरीजची श्रेणी उपलब्ध करणाऱया बोट कंपनीने ब्लिंक इट सोबत नुकताच भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. बोट आपल्या उत्पादनांची विक्री आता ब्लिंक इट या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करू शकणार आहे. या भागीदारीनंतर बोटची उत्पादने सध्याला निवडक शहरांमध्ये काही मिनीटात ऑर्डर केल्यानंतर मिळू शकणार आहेत.
दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकत्ता, बेंगळूर या शहरांमध्ये बोटची नवी उत्पादने ग्राहकांना त्यांच्या घरी काही मिनिटांमध्येच मिळू शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ब्लिंक इटचे सीईओ व सह संस्थापक अलबिंदर ढिंडसा म्हणाले, की बोट ही कंपनी विविध ऍक्सेसरीजच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राहिली असून कंपनीची लोकप्रियता सर्व दूर पोहोचली आहे. हे पाहता आम्ही ब्लिंक इट सोबत भागीदारी केली असून त्यांच्यामार्फत आमच्या ग्राहकांना त्यांची आवडती उत्पादने तत्परतेने मिळू शकणार आहेत. हेडफोनसह स्मार्टवॉच त्याचप्रमाणे स्पीकर्स अशी विविध उत्पादने बोट तयार करत असून त्यांचा पुरवठा ग्राहकांना सोयीस्करपणे होऊ शकणार आहे.