ऑनलाईन टीम / ला पाज :
बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अंज यांनीच ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
अंज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या घरातच वेगळी राहणार आहे. माझी प्रकृती स्थिर असल्याने मी घरातूनच सर्व कामे करणार आहे.
कोरोना संक्रमणाच्या यादीत बोलिवियाचा जगात 40 वा नंबर लागतो. बोलिवियामध्ये आतापर्यंत 44 हजार 113 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1638 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 हजार 354 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 29 हजार 121 रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामधील 71 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.