ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये शनिवारी 968 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण कोरोनाबळींची संख्या 50 हजारांपार गेली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 10 लाख 70 हजार 139 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 50 हजार 058 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
10.70 लाख कोरोनाबाधितांपैकी 5 लाख 43 हजार 186 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 लाख 76 हजार 895 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 23 लाख 30 हजार 769 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 21 हजार 983 जणांचा मृत्यू झाला आहे.