ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये 1 कोटी 12 लाख 84 हजार 269 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 73 हजार 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शुक्रवारी या देशात 78 हजार 297 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2207 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 1.12 कोटी बाधितांपैकी 99 लाख 58 हजार 566 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 10 लाख 52 हजार 579 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या देशात आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.