टोकियो : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या हॉकी या क्रीडा प्रकारात आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाला शुक्रवारी होणाऱया आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. भारतीय महिला हॉकी संघाने आतापर्यंत आपले खाते उघडलेले नाही.
अ गटातील भारत आणि आयर्लंड यांच्यातील लढत येथे शुक्रवारी होत आहे. या गटात भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. प्रत्येक गटामध्ये सहा संघांचा समावेश आहे. भारतीय संघाला पहिल्या सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.