प्रतिनिधी / बेळगाव
श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग,समर्थ नगर बेळगांव येथे गुरुवार दिनांक 30/7/2020 रोजी सकाळी ठीक 9 वाजता कोरोना या महाभयंकर रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून होमिओपथिक अर्सनिक अल्बम ३० या गोळ्याचे महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगांव तसेच श्री एकदंत युवक मंडळ समर्थ नगर तर्फे मोफत वितरण करण्यात आले. समर्थ नगर मालिकार्जुन नगर मधील नागरिकांना २०० हुन अधिक गोळ्याचे वाटप करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगांव चे जिल्हा अध्यक्ष श्री किरण गावडे यांनी या महाभयंकर रोगाला घाबरून जाऊ नका सरकारचे नियम पाळा कोरोनो घालावा तसेच ह्या गोळ्यांचा डोस कोणत्या पद्धतीने घ्यायचे हे नागिरीकांना समजावून सांगितले.यावेळी श्री किरण गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती श्री शिवाजी महाराज्याच्या मूर्तीला हार अर्पण करून पूजा करण्यात आली.तसेच समर्थ नगर मधील डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांनी सुध्या नागिरीकांना घाबरून जाण्याचे कारण नाही सोशल डिस्टिंग, मास्क परिधान करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये असे अनेक सल्ले दिले. व सफाई कर्मचारी यांना देखील गोळ्या वाटण्यात आल्या.याप्रसंगी पाहुण्यांचे रोप देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी मेघन लगरकांडे,नागेश गावडे, केदारी कुंभार, महेश पालकर, रवींद्र पाटील,महेश चौगले, परशराम बेकवाडकर, अशोक खवरे,निर्मल कणेरी,रमेश कनबरकर,विनोद गेहलोत, किशोर कुंडेकर,गिरीश कणेरी, निलेश गावडे,किरण लंगरकांडे,शुभम उचगावकर श्री अरुण गावडे यांनी आभार मानले.समर्थ नगर मधील नागिरीक व महिला मोठ्ठया संख्येने उपस्थित होते