किरण कांदोळकरांचे मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर : मटकावाल्यांचा वाद शिगेला
प्रतिनिधी /म्हापसा
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांचा वाद शिगेला पोहोचला असून दोघांनीही आरोप प्रत्यारोपावर भर दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कोलवाळ पोलीस स्थानकाचे उद्घाटनावेळी मटकेवाले जास्त बोलू लागले आहेत असे संबोधले होते त्याला जाब विचारताना पत्रकारांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांना छेडले असता श्री कांदोळकर म्हणाले, भाजप बरोबर असल्यास नरेंद्र मोदीच्या गंगेत बुडून काढतात. काँग्रेसवाले कितीही पापी असले तरी ते शुद्ध होतात. त्यांना जसे सोडून गेले की तो पापी, गुन्हेगार. मटकेकार पाहिजे ना तुला. मटका बंद करणार तर त्याचा प्रथम कर. दक्षिणेत कोणतरी बाबू म्हणून आहे त्याला प्रथम बंद करून दाखवा असे खुले आवाहन किरण कांदोळकर यांनी बोलताना थेट मुख्यमंत्र्यांना केले आहे.
तुमच्या आत आहे, तुमच्या मंत्री मंडळात बसलेला आहे. गोवा मेन हा मटका राज्य सरकारने राज्यात आणला असा थेट आरोप ते आपण करीत असल्याचे यावेळी किरण कांदोळकर यांनी सांगितले. मटक्याचे कमिशन खुद्द मुख्यमंत्री खातात असा आरोपही त्यांनी यावेळी केला. हा कसला गोवा मेन वा कल्याण तो आपल्यास माहीत नाही असेही ते म्हणाले. गेल्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आरोप केल्याचे मी ऐकले आहे पण ते आपल्यास म्हटले असे वाटत नाही. पण मुख्यमंत्री राज्यात मटका व्यवसाय चालतो असे मानतात आणि तेही मोठमोठय़ा पोलीस अधिकाऱयांच्या व्यासपीठावर राहून मुख्यमंत्री आपल्या खात्यावरच टिका करीत आहेत. आपल्या खात्यात काय चालले आहे तेही जनतेला दाखवून देत आहेत. आपल्या खात्यात त्यांचा विश्वास नाही.
आमदार निळकंठ हळर्णकरांनी सर्वांचा विश्वासघात केला
आमदार धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना थिवी वासीय घाबरणार नाही. आमदारांनी लोकांचा विश्वासघात केला आहे. या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारणाऱयांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. हे कोलवाळमध्ये पोलीस स्थानक आमदारावर तक्रार नोंदविण्यासाठी आणले आहे. या आमदारांना टॉर्च घेऊन शोधावे लागत आहे. मुख्यमंत्र्यावर ऑक्सिजनमुळे अनेक जण मृत पोचले त्याची तक्रार काँग्रेसने पोलीस स्थानकात केली आहे त्याची चौकशी त्यांनी प्रथम करावी. कुणाला धमकावण्याची भाषा आमदार करीत आहेत. आम्हालाही भडकायला कळते आमदारांनी नाहक भडकू नये. थिवीत पोलीस स्थानक आणले म्हणून वासीय आमदारांना घाबरणार नाही असे कांदोळकर यांनी स्पष्ट केले.