प्रदीप बखले, हर्षद तळावलीकराचे आरोप म्हणजे खोटारडेपणाचा कळस : मडकईत भाजपा बुथ समितीच्या बळकटीवर मैदानात उतरणार
प्रतिनिधी / फोंडा
मडकई मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोमतंक पक्षाच्या कार्यासाठी सन 2007 सालापासून सक्रिय होतो. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतरही जिल्हा पंचायत निवडणूकीच्या उमेदवारीसाठी मगो पक्षाने डावरल्यामुळेच केंद्रातील नरेद्र मोदीचे कार्याला अनुसरून आपल्या कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केल्याची माहिती नुकतेच भाजपात प्रवेश केलेले उद्योजक तथा समाजसेवक सुदेश भिंगी यांनी दिली.
फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे नेते प्रदीप शेट, सौरभ लोटलीकर, संदीप नाईक, शुभम किर्लपालकर उपस्थित होते. मागील काही दिवसापुर्वी मगो पक्षाचे बोलबच्चन प्रदीप बखले व हर्षद तळावलीकर यांनी सुदेश भिंगी हे मगो पक्षाचे कार्यकर्तेच नव्हते असे प्रसारमाध्यमांना सांगितले. भिंगी फुडस्चा जीएसटी घोटाळा उघडयावर येणार म्हणून भाजपात दाखल असे बिनबुडाचे खोटारडे आरोप करून आपली बदनामी चालविलेली आहे.
कॅटरींग व्यवसायाची बदनामी, कागदोपत्री पुरावा द्यावा
आपल्या कुटूंबिय व कॅटरींग व्यवसायाविषयी बदनामीचा सुर आळवणाऱया मगो पक्षाचा बोलबच्चन प्रदीप बखले यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावे असे आव्हान भिंगी यांनी दिले आहे. बखले यांच्या आरोपावर खुलासा करताना किर्लपालकर या व्यक्तीला मतदान हक्क बांदोडा पंचायत क्षेत्रात असल्याचा सांगितले. मगो पक्षात कार्य केल्याचा पुरवा वर्तमानपत्राच्या कात्रणासह महालक्ष्मी इग्लिश हायस्कूलात स्व. नाना तळावलीकर यांच्याहस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मगो पक्षातर्फे मेळावा, त्यानंतर महिलांसाठी मेळावा आयोजित करण्यातही पुढाकार घेतल्याचे नमूद करीत बखले यांचे सर्व आरोप खोटारडेपणाचा कळस असल्याचे म्हटले आहे. पंचसदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या नारायण उर्फ नाना तळावलीकर यांच्या पुत्रांवर भाष्य करणे टाळत त्यांचा राजकीय अनुभव कमी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
भिंगी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की भाजपा पक्षाला मडकईत बुथ स्तरावर रूजविण्याचे काम आपण हाती घेतले आहे. मगो पक्षासारखा एकही बुथ कमिटी ग्रामपातळीवर नसल्याप्रमाणे न राहता वाडयावाडय़ात-गावात बुथ समिती स्थापन करण्यात येईल, याकामी युवकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुदिन म्हणजे मडकईचा लालू प्रसाद यादव-प्रदीप शेट
मडकईत महाराष्ट्रवादी गोमतंक पक्ष (मगो) म्हणजे इतर राज्यात लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग सारख्या नेत्यानी आपला पक्ष कुटूंबापुरता जहागिरदारीसारखा ठेवला तसा सुदिने मगो पक्ष आपल्या कुटूंबापुरता मर्यादीत ठेवलेला आहे. बहुजन समाजाचा पक्ष म्हणून ओळख ही केवळ मडकईच्या भोळय़ा जनतेकडून सत्तेत टिकून राहण्यासाठी केलेला अट्टाहास आहे. स्व. मनोहर पर्रिकर यांच्या आशिर्वादामुळेच सुदिनला सत्तापिपासू राजकारण करण्यासाठी वाव मिळाला असा आरोप भाजपाचे नेते प्रदीप शेट यांनी केला.
प्रदीप बखले थापा मारण्यात पटाईत–विठ्ठलदास नागवेकर
प्रदीप बखले हा भूलथापा मारण्यात पटाईत असल्याचा प्रतिआरोप विठ्ठलदास नागवेकर यांनी केला. पत्रकार परिषदेत जर-तर च्या भाषेत बोलू नये, भिंगी कुटूंबियांनी कबाडकष्टाने कॅटरींग व्यवसाय उभारलेला आहे. प्रसारमाध्यमासमोर बोलताना जीबेला आवर घाला, तुमच्या बोलीतून राजकारण, समाजकरण नसून अर्थकरणाचा वास येत असल्याचा टोमणा हाणला. सुदेश भिंगी मगो पक्षात सक्रीय असल्याचा इतिहास मडकईच्या लोकांना सर्वशुत आहे. प्रदीप बखलेसारख्या केवळ मतदानापुरते मगो पक्षासाठी काम करणाऱया तोडी ही भाषा शोभत नसल्याचे ते नागवेकर म्हणाले.