वार्ताहर / कडोली
बेळगाव तालुक्मयातील मण्णीकेरी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तीन लाख रुपये किमतीचे देवीच्या अंगावरील दागिने आणि हुंडीतील रक्कम चोरटय़ांनी लांबवून परिसरात दहशत निर्माण केली आहे. सदर चोरीची घटना मंगळवारी उघडकीस आली.
बेळगाव तालुक्मयात चोरटय़ांनी मंदिरांना लक्ष्य केले असून दागिने लांबविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मी गल्ली, मण्णीकेरी येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरटय़ांनी मंदिराचे प्रवेशद्वार तसेच गाभाऱयाचे प्रवेशद्वार तोडून ही चोरी केली आहे.
मंदिरातील हुंडीमध्ये सुमारे दीड लाख रुपये होते. ही हुंडी फोडून रक्कम लांबविली आहे. त्याचप्रमाणे देवीच्या अंगावरील सुमारे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने तर अर्धा किलो चांदीचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले आहेत. याप्रकरणी काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.