पणजी/ प्रतिनिधी
ज्ये÷ पत्रकार वामन सुभा प्रभू यांनी माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याशी निगडित विविध आठवणींवर आधारित लिहिलेल्या ’मनोहर पर्रीकर – ऑफ द रेकॉर्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार 15 जानेवारी रोजी होणार आहे. सहित प्रकाशनच्यावतीने सदर पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता पणजीतील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व व मास्टेकचे संस्थापक अध्यक्ष आशांक देसाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कोविड – 19’ महामारीच्या निर्बंधांमुळे हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असल्याचे असे लेखक वामन प्रभू आणि सहित प्रकाशनचे किशोर अर्जुन यांनी कळविले आहे.