मुंबई
महिंद्रा आणि महिंद्राच्या संचालक मंडळाने आशिष शहा यांच्या नियुक्तीला नुकतीच मंजुरी दिली आहे. परिणामी आता आशिष शहा हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून आपला पदभार येत्या 2 एप्रिलपासून सांभाळणार असल्याचे समजते. शहा हे सध्याला उपव्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुपचे मुख्य वित्त अधिकारी म्हणून कंपनीत कार्यरत आहेत. ट्रक्टर ते तंत्रज्ञान या महिंद्रा कंपनीच्या 20 डिसेंबर 2020 पासून राबवलेल्या योजनेला मिळालेल्या यशाबद्दल वरील नियुक्ती करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या कंपनीत असणारे पवन गोयंका हे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावरून निवृत्त होणार आहेत.