वृत्तसंस्था/ पॅरीस
डब्ल्यूटीए टूरवरील आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंची ताजी मानांकन यादी सोमवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र अमेरिकेच्या सेरेना विलीयम्सला पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आले नाही. बेलारूसच्या साबालेन्काने अलिकडे लिंझमधील टेनिस स्पर्धा जिंकून मानांकनात 10 वे स्थान मिळविताना सेरेनाला खाली खेचले आहे.
महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 8717 गुणांसह पहिल्या, रूमानियाची हॅलेप 7255 गुणांसह दुसऱया, जपानची ओसाका 5780 गुणांसह तिसऱया, अमेरिकेची केनिन 5760 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5260 गुणांसह पाचव्या, झेकची प्लिसकोव्हा 5205 गुणांसह सहाव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 4555 गुणांसह सातव्या, झेकची क्विटोव्हा 4516 गुणांसह आठव्या, हॉलंडची बर्टन्स 4505 गुणांसह नवव्या, बेलारूसची साबालेन्का 4220 गुणांसह 10 व्या, अमेरिकेची सेरेना विलीयम्स 4080 गुणांसह 11 व्या स्थानावर आहेत.