वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण देशामध्ये हॉकी मास्टर्सला प्रोत्साहन आणि विकास होण्याच्या दृष्टीकोनातून हॉकी इंडियाच्या मास्टर्स समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये हॉकी इंडियाच्या सलग्न असलेल्या विविध राज्यांच्या सदस्यांचा समावेश आहे.
विश्व मास्टर्स हॉकीचे हॉकी इंडिया सदस्य असून आतापर्यंत संपूर्ण जगातील 38 राष्ट्रीय संघटनांचा यामध्ये समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने विश्व मास्टर्स हॉकीला अधिकृत मान्यता दिली आहे. आता विश्व मास्टर्स हॉकीतर्फे विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर्स हॉकी स्पर्धा भरविल्या जातील. हॉकी इंडिया मास्टर्स समितीमध्ये भारताचे माजी कर्णधार परगतसिंग, मिर रंजन नेगी, गुरूबक्ष सिंग आणि छेत्री यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या समितीचे नेतृत्व हरविंदर सिंग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.