वृत्तसंस्था/ गोंडा
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हय़ात महम्मद अदनान नामक पतीने आपल्या पत्नीवर आपल्या चुलत भावासह बलात्कार करून तिला तोंडी तलाक दिल्याची घटना घडली असून पतीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पतीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर तीन तलाकविरोधी कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पत्नीच्या तक्रारीनुसार पतीने चुलत भावाच्या साथीने तिचे लैंगिक शोषण केले असून हुंडय़ाची वारंवार मागणी करून तिला जबर मारहाणही केली आहे. हुंडा देणे शक्मय नसल्यामुळे तिला तोंडी तलाक देऊन घराबाहेर काढण्यात आल्याचेही तिचे म्हणणे आहे.