प्रतिनिधी /पणजी
येथील मांडवी पुलावरून एका वयोवृद्ध महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. याबाबत पणजी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन नदीत सदर महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संध्याकाळी उशिरा सदर महिलेच्या मृददेहाचा शोध लागला. महिलेची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न केला असता महिलेचे नाव मारिया बागांझा रा. म्हापसा असे असल्याचे आढळून आहे. पणजी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. महिलेच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला संपर्क न झाल्यामुळे मृतदेह गोमेकॉत पाठविला आहे.
आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.