तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
जनतेने घाबरुन न जाता कोरोनाच्या संकटास तोंड द्यावे. आरोग्यविषयक सर्व सुचनांचे पालन करुन या विषाणुचा फैलाव रोखावा, असे आवाहन करमाळा माढा मतदारसंघाचे माजी आ. नारायण पाटील यांनी केले. माजी आ. पाटील यांनी माढा तालुक्यातील रोपळे, कव्हे या गावामध्ये भेटी दिल्या, यावेळी ते बोलत होते, पुढे माजी आ. पाटील म्हणाले कि, मी सदैव जनतेच्या पाठीशी असुन मतदार संघास चांगली आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तर या भागातील रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आपण पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी कोरोना निवारण व उपचारासाठी जि. प. कडून आठ कोटी पन्नास लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून आता शासकीय रुग्णालयात जास्तीत जास्त आरोग्य सुविधा मिळवून देण्यात येतील, असे सांगितले. प्रास्तविक माजी आ. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले, तर आभार शरद पाटील यांनी मानले. सुत्रसंचलन गणेश जगताप यांनी केले.
यावेळी सरपंच तात्यासाहेब गोडगे, अजित तळेकर, हर्षल वाघमारे तसेच कव्हे व रोपळे येथील ग्रामसेवक आदींनीही मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क व सॅनिटायझर या सहाय्याने दक्षता घेण्यात आली.
यावेळी जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, केमचे सरपंच युवानेते अजितदादा तळेकर यांचेसह आरोग्य विभागाच्या राखी भंडारी, जगताप, ढेरे तसेच सरपंच तात्यासाहेब गोडगे, युवासेनेचे हर्षल वाघमारे (कव्हे), उपसरपंच तानाजी दास, तंटामुक्ती अध्यक्ष शरद पाटील, आनंद गोडगे, फंड सर, धनाजी पाटील, नागनाथ मेहेर, अशोक मेहेर, शिवाजी लोंढे, गणेश दास, अतुल दास, अनिल दास, डॉ. सय्यद, खाजा हुसेन पल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.