ऑनलाईन टीम / मुंबई :
मान्सूनने संपूूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, येत्या पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी चांगल्या स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी ही माहिती दिली.
राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, येत्या 24 तासांत पुणे, मुंबईसह राज्यातील उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे. आज मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे़. तर 15, 16 जून रोजी कोकणासह पालघर, ठाणे, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.