दिल्ली कॅपिटल्सवर सहज मात, क्विन्टॉन डी कॉक सामनावीर
वृत्तसंस्था/ अबु धाबी
क्विन्टॉन डी कॉक (53) व सुर्यकुमार यादव (53) यांच्या फटकेबाजीनंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सहज मात केली. प्रारंभी, अनुभवी डावखुरा फलंदाज शिखर धवनचे (52 चेंडूत 69) नाबाद अर्धशतक व कर्णधार श्रेयस अय्यरच्या 33 चेंडूतील 42 धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने 4 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, मुंबईने सरस फलंदाजीसह 19.4 षटकात 5 गडी राखून विजय साकारला.
दिल्ली संघातर्फे धवनने 6 चौकार व 1 षटकार फटकावले तर अय्यरच्या 42 धावांच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश राहिला.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉने पहिल्याच चेंडूवर चौकार फटकावत समयोचित सुरुवात केली. पण, पुढील चेंडूवर आणखी एक आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने जणू आपली विकेटच बहाल केली. शॉर्ट कव्हरवरील कृणाल पंडय़ाने शॉचा सोपा झेल टिपला. या लढतीत तिसऱया स्थानी फलंदाजीची संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणेला 15 चेंडूत 15 धावांवर समाधान मानावे लागले.
त्यानंतर धवन व अय्यर यांनी तिसऱया गडय़ासाठी 85 धावांची भागीदारी साकारत संघाला 14.4 षटकात 109 धावांपर्यंत नेले. स्टोईनिस 13 धावांवर धावचीत झाला, त्यावेळी दिल्लीची 16.3 षटकात 4 बाद 130 अशी स्थिती होती. धवनने नंतर ऍलेक्स कॅरेच्या (9 चेंडूत नाबाद 14) साथीने आणखी 32 धावा जोडल्या. दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग संघाच्या फलंदाजीवर फारसे खुश दिसून आले नाहीत.
प्रत्युत्तरात मुंबईने कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतरही धावगती उत्तम राहील, याची काटेकोर काळजी घेतली आणि अंतिमतः एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. कृणाल पंडय़ा, गो. बोल्ट 4 (3 चेंडूत 1 चौकार), शिखर धवन नाबाद 69 (52 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), अजिंक्य रहाणे पायचीत गो. कृणाल पंडय़ा 15 (15 चेंडूत 3 चौकार), श्रेयस अय्यर झे. बोल्ट, गो. कृणाल पंडय़ा 42 (33 चेंडूत 5 चौकार), स्टोईनिस धावचीत (यादव/चहर) 13 (8 चेंडूत 2 चौकार), ऍलेक्स कॅरे नाबाद 14 (9 चेंडू). अवांतर 5. एकूण 20 षटकात 4 बाद
162.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-4 (शॉ, 0.3), 2-24 (अजिंक्य रहाणे, 4.2), 3-109 (श्रेयस, 14.4), 4-130 (स्टोईनिस, 16.3).
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट 4-0-36-1, पॅटिन्सन 3-0-37-0, बुमराह 4-0-26-0, कृणाल पंडय़ा 4-0-26-2, केरॉन पोलार्ड 1-0-10-0, राहुल चहर 4-0-27-0.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. रबाडा, गो. अक्षर 5 (12 चेंडू), क्विन्टॉन डी कॉक झे. शॉ, गो. अश्विन 53 (36 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), सुर्यकुमार यादव झे. अय्यर, गो. रबाडा 53 (32 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), इशान किशन झे. अक्षर पटेल, गो. रबाडा 28 (15 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. कॅरे, गो. स्टोईनिस 0 (2 चेंडू), केरॉन पोलार्ड नाबाद 11 (14 चेंडूत 1 चौकार), कृणाल पंडय़ा नाबाद 12 (7 चेंडूत 2 चौकार). अवांतर 4. एकूण 19.4 षटकात 5 बाद 166.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-31 (रोहित, 4.6), 2-77 (डी कॉक, 9.5), 3-130 (सुर्यकुमार, 14.6), 4-130 (पंडय़ा, 15.2), 5-152 (इशान, 17.3).
गोलंदाजी : रबाडा 4-0-28-2, नोर्त्जे 4-0-28-0, अक्षर पटेल 3-0-24-1, अश्विन 4-0-35-1, हर्षल पटेल 2-0-20-0, स्टोईनिस 2.4-0-31-1.