ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रांचच्या संयुक्त पथकाने आज पहाटे जोगेश्वरीमध्ये एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. झाकीर असे या दहशतवाद्याचे नाव असल्याचे सांगण्यात येते.
दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमने काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी कट उलथून लावत 6 संशयित दहशतवाद्यांना विविध राज्यांमधून अटक केली होती. त्यामध्ये मुंबईतील धारावी परिसरात राहणारा दहशतवादी जान मोहम्मद अली शेख याचाही समावेश होता. त्याच्यासोबत झाकीरचे संबंध असल्याचे समोर आले आहे. सणासुदीच्या काळात देशात दहशतवादी हल्ले करण्याचा या दहशतवादांचा कट होता. अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ अनीस यासाठी पैसे आणि शस्त्र पुरवत होता. तसेच या हल्ल्यांसाठी पाकिस्तानची आयएसआय या लोकांना ट्रेनिंग देत होती.