बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी बेंगळूर शहरासाठी नवीन पार्किंग धोरण २.० चा आढावा घेतला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर येडियुरप्पा यांनी राज्याचे मुख्य सचिव टी.एम. विजयभास्कर यांना अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून धोरणात्मक मसुद्यात सुधारणा करून पुढील मंत्रिमंडळासमोर मांडण्याची सूचना केली.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पार्किंग पॉलिसी २.० आवश्यक असल्याची माहिती दिली. कारण शहरातील वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत दुप्पट झाली आहे.
शहरी भू-परिवहन संचालनालय (डीयूएलटी) द्वारा पार्किंग पॉलिसी २.० तयार केली जात आहे. शहरातील अधिकारी आणि निवासी कल्याण संघटनांशी संवाद साधताना मिळालेल्या धोरणासंदर्भातील प्रतिसाद आणि अभिप्राय याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही माहिती दिली. नंतर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिप्रायाच्या आधारे धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.