विधानपरिषदेत जोरदार चर्चा : मैला काढण्यासाठी व्यक्तीचा वापर केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करा
प्रतिनिधी/ बेळगाव
डोक्मयावरून मैला वाहून नेणे किंवा चेंबर ब्लॉक झाल्यास त्यामध्ये उतरून स्वच्छ करणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यूदेखील झाला आहे. 28 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली गेली आहे, असा उल्लेख झाल्याने विधानपरिषद सभागृहात बराच गोंधळ उडाला. ही पद्धत कायमस्वरुपी बंद करण्यासाठी सरकारने गांभीर्याने पाऊल उचलावे, अशी मागणी विधानपरिषद सदस्य बी. के. हरिप्रसाद यांनी केली.
सरकार तसेच विरोधी पक्षांनी हा प्रश्न चिंतेचा असल्याचे सांगत त्याला आळा घालावा, असा सूर सभागृहात उमटला. रामनगर-मंडय़ामध्ये मैला काढण्यासाठी उतरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, तो अपघात झाला, असे भासविण्याचा प्रयत्न अभियंत्याने केला. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे बी. के. हरिप्रसाद यांनी यावेळी सांगितले.
जीवन जगण्यासाठी एखादी व्यक्ती असे काम करू शकते. मात्र, असे काम करून घेणारा व्यक्ती हा मोठा गुन्हेगार आहे. अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात डांबा, असा सूरदेखील सभागृहात उमटला. आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी नोंद आहे. अशा कुटुंबांचा सर्व्हे होणेदेखील महत्त्वाचे आहे. आतापर्यंत बारा जिल्हय़ांचा सर्व्हे झाला असून 5 हजार 80 जण सफाई काम करत असल्याचे उघडकीस आले आहे.
अद्याप 18 जिल्हय़ांचा सर्व्हे होणे बाकी आहे. तो तातडीने व्हावा, याचबरोबर स्मार्ट सिटी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेव्हा या शहरांमध्ये ड्रेनेजचे काम आधुनिक पद्धतीने करावे, अशी सूचनादेखील मांडण्यात आली. मैला काढण्यासाठी किंवा वाहतूक करण्यासाठी मनुष्य व्यक्तीचा वापर करू नका. त्यासाठी सकिंग मशीनचा वापर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी सूचनादेखील यावेळी करण्यात आली. शौचालय टाकी साफ करण्यासाठी कर्मचाऱयांना लावू नये, हे अपमानीत कृत्य आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित अधिकाऱयांना सक्त ताकीद करावी, अशी मागणीही विधानपरिषद सदस्यांनी केली आहे. एकूणच सफाई कर्मचाऱयांच्या कामाबद्दल तसेच त्यांच्या समस्यांबाबत अनेकांनी प्रश्नांचा भडिमार करून त्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.