नवी दिल्ली :
मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन मोटो जी 9 भारतीय बाजारात नुकताच दाखल केला आहे. नवा स्मार्टफोन 6.5 इंच मॅक्स व्हिजन एलसीडी डिस्प्लेसह असणार आहे. मध्यम गटातील ग्राहकांना हा स्मार्टफोन पसंत पडेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय. मोटो जी 9 हा जी सिरीजमधील असून चिनी ब्रँड शाओमी आणि रियलमी यांना टक्कर देणार असून किंमतही त्या तुलनेत कमी ठेवण्यात आली आहे. 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येणाऱया या फोनची किंमत 11 हजार 499 रुपये इतकी असणार आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून हा फोन 31 ऑगस्टपासून विक्रीला उपलब्ध केला जाणार आहे. फोरेस्ट ग्रीन आणि सफाइर ब्लू या दोन रंगात हा फोन येणार आहे. फ्लिपकार्ट या फोनवर 5 टक्के कॅशबॅकची ऑफर देणार आहे.