प्रतिनिधी/ पणजी
यशराज देसाई हे कुजीरा येथील एस.एस.धेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सचे टीवायबीबीए विद्यार्थी आहेत. त्यांची इच्छा, महत्वाकांक्षा आणि चालू घडामोडींबद्दलचे ज्ञान तसेच विश्लेषण करण्याची क्षमता आणि यशस्वी होण्याची इच्छाशक्ती यामुळेच त्यांना गोव्यातील डेअरिंग डिबेट चॅम्पियन म्हणून प्रतिष्ठित पदक मिळू शकले. गोव्याच्या डेअरिंग डिबेट चॅम्पियनचे विजेतेपद मिळवून मला खूप आनंद झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या विद्यालयाचे प्रतिनिधित्व करणे आणि माझे महाविद्यालय- एस.एस.धेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स ऍड इकॉनॉमिक्सचा राज्य स्तरावर पदक मिळवणे हे अभिमानास्पद आहे. आगामी फेब्रुवारी 2020 महिन्यांत होणाऱया राष्ट्रीय स्तरावरील धाडसी वाद-विवादात स्पर्धेचे गोव्याचे प्रतिनिधित्व ते करणार आहेत.