सलग तिसऱया वर्षी राज्यात प्रथम – प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी /ओरोस:
सर्व शाळांची माहिती यू डायस प्रणालीत संगणकीकृत करण्याच्या प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षण विभाग राज्यात पहिला क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. सलग तिसऱया वर्षी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
भारत सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त यू डायस प्लस 2020-21 ही ऑनलाईन प्रणाली सन 2018-19 पासून विकसित करण्यात आली आहे. जिल्हय़ातील शाळांची या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत माहिती भरण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात 2018-19 आणि 2019-20 या दोन्ही वर्षांत राज्यात अव्वल ठरला होता. यावषीही सिंधुदुर्गनेच बाजी मारली आहे.
यू डायस प्लसची भरलेली ऑनलाईन माहिती शाळांनी 15 मेपर्यंत भरून 30 मे 2021 पर्यंत प्रमाणित करण्याबाबत राज्य शासनाकडून कळविण्यात आले होते. 24 मे रोजी जिल्हय़ातील 98.66 टक्के शाळांची ऑनलाईन माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली होती. प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी उर्वरित शाळांनी एक ते दोन दिवसांत माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन 24 मे रोजी व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देऊन उर्वरित शाळांनी कार्यवाही पूर्ण केली व राज्यात पुन्हा एकदा अव्वल क्रमांक प्राप्त केला.
यासाठी संगणक प्रोग्रामर शत्रुघ्न चव्हाण, समग्र शिक्षाचे सर्व तालुक्मयांचे डाटा एन्ट्री ऑपरेटर, एम. आय. एस. को-ऑर्डिनेटर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट समन्वयक, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे एकनाथ आंबोकर यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील सर्व शाळांची माहिती ‘यू डायस प्लस’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येते. या माहितीचा उपयोग भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, शाळेतील वर्गखोली दुरुस्ती व इतर बांधकाम बाबत, शिष्यवृत्ती विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बाल विकास विभाग, मध्यान्ह भोजन योजना या विभागातील योजना राबविताना केला जातो.