प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दुसऱया दिवशी रात्री परमेश्वरनगर-येळ्ळूर येथील ग्राम पंचायतच्या एका माजी सदस्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामधील चौघांना उच्च न्यायालयाने विविध अटींवर जामीन मंजूर केला आहे.
अनिल उर्फ अनुज प्रकाश कुगजी (वय 21), युवराज सिद्धाप्पा मजूकर (वय 26), रोशन महादेव मालुचे (वय 21) व मनोज दुंडाप्पा कुगजी (वय 21, चौघेही रा. येळ्ळूर) अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. तर या प्रकरणातील संशयित आरोपी सुनील रामचंद्र कुंडेकर (वय 32), नागराज सुरेश मजूकर (वय 25, दोघेही रा. येळ्ळूर) यांना मात्र जामीन मिळाला नाही.
या सर्वांनी मुकुंद कृष्णा घाडी (वय 41, रा. परमेश्वरनगर-येळ्ळूर) यांचा क्षुल्लक कारणावरून येळ्ळूर येथे खून केला होता. त्यानंतर या सर्वांवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या सर्वांनी जिल्हासत्र न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तेथे या सर्वांना जामीन नाकारण्यात आला होता. त्यानतंर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी 1 लाख रुपयांचे हमीपत्र, तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार या अटींवर जामीन मंजूर केला आहे.
क्षुल्लक कारणावरून दि. 18 एप्रिल 2021 रोजी रात्री मुकुंदला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुकुंदवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. यामधील चौघांना जामीन मिळाला आहे. या संशयितांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. नागरत्ना पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर आणि ऍड. बाळू हुनशीहाळ यांनी काम पाहिले.