गणपतीपुळेत भेळविक्रेता पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे भेळविकेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आह़े. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आह़े. दरम्यान या भेळविकत्याच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़. दरम्यान जिह्यात देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आह़े.
गुरूवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या कारोना चाचण्यांमध्ये 23 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 07 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 16 कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़.
यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 12 संगमेश्वर 08, लांजा 02 चिपळूण येथे 01 नवे रूग्ण आढळून आला आह़े. जिह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 733 इतकी झाली आह़े तर गुरूवारी कोरोनापासून बरे झालेल्या 24 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 233 वर पोहचले आह़े जिह्यातील बरे होण्याचे पमाण 94.27 इतके आह़े.
मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 87, खेड 51, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 76, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 03 असे एकूण 319 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्ये झाला आह़े एकूण रूग्ण 8733
नवे रूग्ण -23
नवे मृत्यू -00
एकूण मृत्यू -319