साहित्य : पाऊण वाटी रवा, पाव वाटी दही, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, अर्धा चमचा आलं पेस्ट, 2 कढीपत्ता पाने बारीक चिरून, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून, 1 चमचा जिरं, 1 कांदा बारीक चिरून, चिमुटभर हिंग, चवीपुरते मीठ, पाणी आवश्यकतेनुसार, पाव चमचा बेकिंग सोडा, तेल तळण्यासाठी
कृती : बाऊलमध्ये रवा घेऊन त्यात दही, हिरवी मिरची, आलं पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात जिरं, कांदा, हिंग आणि मीठ घालून मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून दहा मिनिटे झाकूण ठेवावे. नंतर लागल्यास पाणी घालावे. आता त्यात बेकिंग सोडा घालून मिश्रण मिक्स करावे. गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करावे. तेल गरम झाले की आच मंद करून त्यात छोटी छोटी भजी सोडून सोनेरी रंगावर तळून पेपर नॅपकीनवर काढावीत. आता तयार रवा भजी खोबऱयाच्या चटणीसोबत अथवा टोमॅटोसॉससोबत खाण्यास द्या.