जिल्हय़ात कोरोनाचे 959 नवे रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोनावर मात करणाऱयांची संख्या वाढत आहे. एकीकडे बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही काही कमी नाही. रविवारी 1,734 जणांनी कोरोनावर मात केली असून 959 नवे रुग्ण आढळून आले. तर 5 जण दगावले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 64 हजार 975 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 47 हजार 984 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी सक्रिय रुग्णसंख्येतही थोडीशी घट झाली आहे. ही संख्या 16 हजार 455 वर पोहोचली आहे. बेळगाव तालुक्मयात मृतांचा आकडा वाढतो आहे.
रविवारी बेळगाव तालुक्मयातील 4 व बैलहोंगल तालुक्मयातील 1 असे पाच रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंतचा मृतांचा आकडा 536 वर पोहोचला आहे. अद्याप 2 हजार 737 जणांचे अहवाल यायचे आहे. तर 51 हजारहून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. रविवारी बेळगाव तालुक्मयात 333 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी शहर व उपनगरांमध्ये 213 तर ग्रामीण भागातील 120 जणांचा समावेश आहे.
अथणी, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयातही रुग्णसंख्या वाढती आहे. रविवारी काकती, मुतगा, अरळीकट्टी, कंग्राळी बीके, बडस, बाळेकुंद्री खुर्द, बस्सापूर, बस्तवाड, मारिहाळ, सुळेभावी, पंतनगर, येळ्ळूर, भेंडीगेरी, गजपती, उचगाव, गणेशपूर, गोजगा, गौंडवाड, हिंडलगा, हिरेबागेवाडी, हुंचेनहट्टी, के. के. कोप्प परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण
देवगिरी, ता. बेळगाव येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांबरा एटीएसमध्येही रविवारी दोघा जणांना बाधा झाली आहे. कडोली, खणगाव बीके, कंग्राळी खुर्द, सांबरा, मच्छे, अगसगा, सुळगा, मोदगा, बामणवाडी, कलखांब, पिरनवाडी, होनगा, राणी चन्नम्मानगर, रामनगर, रामतीर्थनगर, वड्डरवाडी, सदाशिवनगर, वडगाव, खासबाग, शहापूर परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत.
अंजनेयनगर, खासबाग, गुरुप्रसाद कॉलनी, महाद्वार रोड, मजगाव, माळी गल्ली, सुतकट्टी, नानावाडी, नाझर कॅम्प-वडगाव, नेहरूनगर, न्यू वैभवनगर, मजगाव, पाटील गल्ली-बेळगाव, श्रीनगर, कॅम्प, चव्हाट गल्ली, क्लब रोड, वंटमुरी कॉलनी, हनुमाननगर, हिंदूनगर-टिळकवाडी, हिंदवाडी, अनंतशयन गल्ली, जोशी गल्ली, जैतनमाळ, कणबर्गी, केळकरबाग, खडेबाजार-बेळगाव, भाग्यनगर, अनगोळ, एपीएमसी रोड, अनसूरकर गल्ली, आझमनगर, आदर्शनगर, अयोध्यानगर, बिम्स क्वॉर्टर्स, शास्त्राrनगर, शिंदोळी, शिवाजीनगर, शिवबसवनगर, विश्वेश्वरय्यानगर, वैभवनगर, वीरभद्रनगर, विनायकनगर, मुत्त्यानट्टी, परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
दोन दिवसांत 46 मुलांना बाधा
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना त्याची बाधा होणार असल्याचे तज्ञ डॉक्टर व वैज्ञानिकांनी सांगितले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या दुसऱया लाटेतच बेळगाव जिल्हय़ात केवळ दोन दिवसात 46 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 1 ते 16 वर्षे वयातील 20 मुली व 26 मुलांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे साहजिकच पालकांबरोबरच प्रशासनाची चिंताही वाढली आहे. शनिवार आणि रविवारी बाधितांच्या मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आणखी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
नियम पाळण्याचे आवाहन
सरकारने कोरोनाची लाट थोपविण्यासाठी 10 मे पासून लॉकडाऊन जारी केला आहे. गेले दोन आठवडे विकेंड लॉकडाऊनही करण्यात आला आहे. कोरोनाचा होत असलेला फैलाव थोपविण्याचा यामागचा उद्देश आहे. लॉकडाऊनच्या काळात सकाळी 6 ते 10 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. या काळात होणारी नागरिकांची गर्दी, नियमांची पायमल्ली, मास्क न वापरताच फिरणे आदींमुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून रोज एक हजारावर नवे रुग्ण आढळून येत आहेत. प्रत्येकाने खबरदारी बाळगली नाही तर रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आणखी कडक नियम लादावे लागतील. तरी प्रत्येकाने अनावश्यकपणे फिरणे टाळून मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.