रेल्वे स्थानकावर क्रूझ क्षेपणास्त्र हल्ला
किव्ह / वृत्तसंस्था
रशियाने पूर्व युक्रेनमधील रेल्वेस्थानकावर क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच 4 मुलांसह 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. डोनेत्स्कमधील क्रामाटोरस्कमध्ये हा हल्ला झाला. हल्ला झाला तेव्हा हजारो लोक टेन सुटण्याची वाट पाहत होते, असे डोनेत्स्कच्या गव्हर्नरनी सांगितले. मात्र, रशियाने या हल्ल्याचा इन्कार केला आहे. तसेच युक्रेनच्या सैन्याने ओडेसामधील लष्करी प्रशिक्षण केंद्र नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध गेल्या 43 दिवसांपासून सुरूच आहे. युपेनमधील बुचा येथे झालेल्या हल्ल्यानंतर ठार झालेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. आम्ही घरातून मृतदेह बाहेर काढत आहोत. एका मृतदेहाच्या डोक्यात गोळी लागली होती. रस्त्यावर आणि आवारातून अनेक लोकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांची संख्या मोठी असल्याचे मदत दलाच्या अधिकाऱयाने सांगितले. याचदरम्यान, युपेनियन बुचा शहरात नरसंहाराच्या आरोपांचा सामना करत असलेल्या रशियाच्या अडचणीत जर्मन दाव्याने भर घातली आहे. त्यांच्या गुप्तचर विभागाने उपग्रहाद्वारे रशियन सैन्याचे रेडिओ प्रसारण रेकॉर्ड केले आहे. या संभाषणात रशियन सैन्याचे अधिकारी सैनिकांना आणि नागरिकांना मारण्याचे आदेश देत आहेत. जर्मनीनेही हा ऑडीओ जारी केला आहे. हा ऑडीओ बुका शहरातील असू शकतो, जिथे यापूर्वी शेकडो नागरिक मारले गेले होते. मात्र, या दाव्याचाही इन्कार करत हा रशियाचा अपप्रचार करण्यासाठी सुरू असलेला खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. तसेच रशियाने प्रथमच युद्धात आपले मोठे लष्करी नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. या युद्धात अनेक रशियन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे रशियन लष्कराचे प्रवक्ते दीमित्री पेस्कोव्ह म्हणाले. मात्र, त्यांनी मृत सैनिकांची संख्या जाहीर केली नाही. यापूर्वी, रशियाने केवळ 1,351 सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली होती.