वार्ताहर/ रहिमतपूर
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका वानराचा झाडावरून पडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
याबाबत वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिलेली माहिती अशी की, रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडावरून खाली पडल्यामुळे सुमारे दीड वर्ष वयाच्या वानराचा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. वानराच्या मृत्यूनंतर आजूबाजूला असलेले वानर वनरक्षक कोळेकर यांना जखमी वानराला नेताना अडथळे निर्माण करत होती. तसेच जखमी वानराला उचलून नेण्याचा प्रयत्न काही वानर करत होते. पशुवैद्यकीय अधिकारी उमेश मस्के यांच्याकडे शवविच्छेदनासाठी वानराला घेऊन जाण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यापूर्वीच वानराचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी उमेश मस्के यांनी सांगितले. दरम्यान वानराचा तीन -चार दिवसांपूर्वी उजवा हात मोडला असल्याची शक्यताही वर्तवली. यानंतर मृत्यू झालेल्या वानराचा पवारवाडी येथील वनहद्दीत वनविभागाच्यावतीने दफनविधी करण्यात आला.