प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जिल्हा सिंधुदुर्ग, प्राणवायू योजनेंतर्गत सेवा इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटरसह जिल्हय़ातील काही खासगी रुग्णालयांना 47 अत्याधुनिक अशी ऑक्सिजन कॉन्सन्टेटर मशीन देण्यात आली. याचा शुभारंभ जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आला.
सध्या सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोना वैश्विक महामारीने कहर केला आहे. जिल्हय़ामध्ये मोठय़ा प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठय़ा प्रमाणात भासत आहे. ही ऑक्सिजनची कमतरता थोडय़ा प्रमाणात पूर्ण करता यावी, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती प्राणवायू योजनेंतर्गत सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून जिल्हय़ातील शासकीय तसेच काही खासगी रुग्णालयांना 47 अत्याधुनिक अशा ऑक्सिजन कॉन्सन्टेटरचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय या रुग्णालयात या पैकी दहा ऑक्सिजन कॉन्सटेट देऊन, या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. हे ऑक्सिजन कॉन्सटेटर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांना सुपुर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सहसंघचालक यशवंत तथा बाबा चांदेकर, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर श्याम पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश नवांगुळ, कार्यवाह जयेश खाडिलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, मालवण तालुका संघचालक तथा जिल्हा संपर्क विभाग प्रमुख ऍड. समीर गवाणकर, जिल्हा प्रचार विभाग प्रमुख लवू महाडेश्वर, प्राणवायू योजना जिल्हा संयोजक अविनाश पाटील, जनकल्याण समितीचे हेमंत आईर, जितेंद्र चिकोडी, प्रभाकर सावंत, डॉ.प्रशांत मंडव, अविनाश पराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक रमेश ढेबे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात शासकीय तसेच खासगी अशा रुग्णालय व कोविड सेंटर अशा ठिकाणी 47 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर देण्यात आले. यात अत्यावश्यक सेवेसाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित रुग्णोपयोगी साहित्य केंद्र – 10, जिल्हा रुग्णालय, ओरोस – 10, ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग – 3, उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा – 2, होमगार्ड कोविड केंद्र, ओरोस – 2, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय – 2, डॉ. दिघे-मालवण – 2, ग्रामीण रुग्णालय वैभववाडी – 2, डॉ. प्रशांत मडव, जांभवडे – 2, कणकवली नगरपरिषद कोविड केंद्र – 2, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी – 2, आपटे मेडीकल फोंडाघाट- 1, डॉ. प्रसाद मालंडकर, खारेपाटण – 1, Ingetraut नाईक प्रति÷ान, नेरुर (डॉ. जी. टी. राणे) – 2, डॉ. विवेक रेडकर रिसर्च हॉस्पिटल-मालवण – 2 आणि श्री साई डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कारिवडे-सावंतवाडी – 2 असे आहेत.