मेष
चंद्र, मंगळ युती, सूर्य, गुरु षडाष्टकयोग होत आहे. धंद्यात मेहनत करून फायदा मिळेल. वादविवाद न करता काम करा. नोकरीत सहकारी मदत करतील. अधिकारी वर्गाशी जुळवून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला सावधपणे वक्तव्य करावयाचे आहे. जुने अनुभव उपयोगी येतील. मनोबल टिकवता येईल. संसारात घरातील व्यक्तींचा आधार मिळेल. प्रवासात सावध रहा.
वृषभ
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद, शुक्र युती होत आहे. धंद्यात किरकोळ अडचण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कायदा पाळा. वाद वाढवू नका. नोकरीत वरिष्ठाना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नविन ओळखी होतील. घरातील कामे होतील. एखादी चांगली बातमी मिळेल. कला, साहित्यात प्रगति करता येईल.
मिथुन
चंद्र, गुरु त्रिकोण योग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने तात्पुरती गुंतवणूक करा. लाभ मिळवा. नोकरी मिळेल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. कायदा पाळा. महत्त्वाचे काम होईल. राजकीय, सामाजिक कार्यात जनसंपर्क वाढवा. समस्या सोडवा. कठीण कामे करून घ्या. मानप्रतिष्ठा मिळेल. संसारात शुभसमाचार मिळेल. कला साहित्यात चमकाल.
कर्क
चंद्र, मंगळ युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोलून काम करा. हिशोब नीट करा. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीतील तणाव कमी होईल. मैत्रीत गैरसमज होईल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यातील समस्या सोडवता येईल. रागावर ताबा ठेवा. लोकांना दुखवू नका. संसारात क्षुल्लक तणाव होईल.
सिंह
चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. रविवार रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. कायद्याचे पालन करा. धंद्यात काम मिळेल. कठोर बोलणे टाळा. नोकरीच्या कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात घाईत निर्णय निश्चित करू नका. टीका होईल. संयम ठेवा. संसारात वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. प्रसिद्धीचा विचार करू नका.
कन्या
चंद्र, मंगळ युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात घाई करू नका. दुखापत होईल. धंद्यात फायदा होईल. चर्चा सफल होईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात स्थिरता ठेवता येईल. लोकांना सहकार्य करा. त्यास तुमचे हित होईल. कठीण वाटणारे काम करून घ्या.
तुला
चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात फायदा होईल. योग्य सल्ल्याने शेअर्समध्ये तात्पुरती गुंतवणूक करा. लाभ मिळवा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. बुधवार, गुरुवार कोणतेही धाडस करू नका. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. लोकांच्या समस्या सोडवता येतील. संसारात सुखद संवाद साधाल.
वृश्चिक
चंद, मंगळ युती, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. संसारात क्षुल्लक मतभेद होईल. नोकरीच्या कामात इतरांना मदत करण्यात वेळ जाईल. वरिष्ठाना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. गुप्त कारवायांना कमी समजू नका. मित्र, शत्रू केव्हाही बदलतील.
धनु
चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य गुरु षडा÷क योग होत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. कठोर बोलणे टाळा. उतावळेपणा करू नका. नोकरीच्या ठिकाणी व्याप वाढेल. कायद्याच्या विरोधात जाण्याचे धाडस करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. संयम ठेवा. राग वाढवणारी घटना घडेल. दुर्लक्ष करा. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. दुखापत टाळा.
मकर
चंद, मंगळ युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तणाव होईल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. संवाद साधता येईल. घरात जवळच्या क्यक्तीची चिंता कराल. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. व्यसन नको. नोकरीत वरिष्ठाच्या कामास सहाय्य कराल. राजकीय, सामाजिक कार्याला नव्या पद्धतीने सुरुवात करा. लोकांना दुखवू नका.
कुंभ
चंद्र, मंगळ युती, बुध गुरु षडाष्टक योग होत आहे. धंद्यात बोलताना सावध रहा. वाद होईल. कायद्याला धरूनच नोकरीत निर्णय घ्या. घरातील व्यक्तीची मदत मिळेल. वृद्धांची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. कोणताही मुद्दा मांडतांना उतावळेपणा नको. आक्रमकता नको. नम्रता ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल.
मीन
चंद्र, मंगळ युती, चंद ख, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नविन येणे वसूल करा. गोड बोला. नोकरीत वर्चस्व वाढेल. वरिष्ठाना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. पदाधिकार मिळण्याची आशा वाढेल. संसारात सुखद समाचार मिळेल. पला, साहित्यात प्रगतीची संधी मिळेल.