वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
5 जी सेवेचे मोबाइल स्मार्टफोन आणण्याच्या शर्यतीमध्ये रिअलमीने दमदार उडी घेतली आहे. त्यांनी आपला स्वस्त 5 जी स्मार्टफोन पुढील वर्षी भारतीय बाजारात दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे सदरचा फोन हा 10 हजार रुपयांखाली असणार आहे.
कंपनीचे भारतातील सीईओ माधव सेठ यांनी वरील माहिती नुकतीच दिली आहे. अल्ट्रा अफोर्डेबल 5 जी फोन हा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा असणार असल्याचे त्यांनी रिअलमीच्या वेबीनारमध्ये सांगितले. मागच्या वर्षी कंपनीने एक्स 50 प्रो 5 जी लाँच केला होता. आता 5 जी फोनच्या बाजारात उतरून नवनवे स्मार्टफोन्स या गटात सादर करण्याचा कंपनीचा हेतू असणार आहे. 15 हजारावरील 5 जी रेडी फोन्सही आणण्याचा विचार कंपनी करते आहे. यांचे 5 जीचे फोन्स जसे की रिअलमी 8, रिअलमी नार्झो 30 प्रो आणि रिअलमी एक्स 7 मॅक्स हे फोन याआधीच बाजारात दाखल झाले आहेत.