रिलायन्सच्या नफ्यासोबत जिओ प्लॅटफॉर्मची उच्चांकी झेप
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मूल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला(आरआयएल) चालू वित्त वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीत 13,248 कोटी रुपयांचा निक्वळ नफा झाला आहे. हिस्सेदारी विक्रीमधून झालेल्या असाधारण उत्पन्नातून कंपनीचा हा नफा वधारल्याची माहिती आहे.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार या अगोदरच्या वित्त वर्षात 2019-20 च्या समान तिमाहीत कंपनीला 10,141 कोटी रुपयांचा निव्वळ लाभ झाला होता. यावेळी कंपनीने दिलेल्या माहितीत हिस्सेदारीच्या विक्रीमधून 4,966 कोटींचे विशेष उत्पन्न प्राप्त केल्याचे स्पष्ट केले आहे.
बाजारातील भांडवल उभारणीच्या जोरावर रिलायन्स देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 88,253 कोटी रुपयांवर पोहचले आहे. कोविड 19 च्या प्रभावामुळे रिलायन्स जिओ, रिटेल आणि ऑयल टू केमिकल (ओ2सी) व्यवसायाच्या आकडेवारीचा अंदाज पाहता ऑयल टू केमिकल व्यवसायाला मागणी कमी होणार असल्याचे संकेत आहेत.
नवी ग्राहक जोडणी
जिओने मागील तिमाहीत 99 लाख नवीन ग्राहक जोडले असून एकूण ग्राहक संख्या 30 जूनपर्यंत 39.83 कोटी झालीय.
जिओची नफा कमाई 183 टक्क्मयांनी तेजीत
कोविडच्या प्रारंभाच्या कालावधीत रिलायन्सची दूरसंचार सेवा देणाऱया रिलायन्स जिओमध्ये जगभरातील दिग्गज कंपन्यांनी गुंतवणूक करण्यात पुढाकार घेतल्यामुळे जिओचा निक्वळ लाभ जून तिमाहीत जवळपास 183 टक्क्मयांनी वधारुन 2,520 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. जिओला मागील आर्थिक वर्षात समान तिमाहीत 891 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सध्याच्या तिमाहीमध्ये मात्र कंपनीने 33.7 टक्क्मयांच्या वाढीसह 16,557 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.