नवी दिल्ली
फ्रान्समधील ऑटो निर्माती कंपनी रेनॉ आपली नवी किगर गाडी याच महिन्यात भारतात लाँच करण्याच्या विचारात असल्याचे समजते. परंतु याबाबत स्पष्टता मात्र कंपनीने केलेली नाही. ग्राहक मात्र या गाडीची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. आगामी तिमाहीत कंपनीची ही नवी सुव्ह गटातील किगर गाडी भारतासह इतर देशांमध्येही सादर केली जाणार आहे. क्वीड, ट्रीबर या गाडय़ांच्या सादरीकरणानंतर कंपनीने किगरला बाजारात सादर करण्यासाठी तयारीवर जोर दिला आहे. जागतिक स्तरावरची कंपनीची ही तिसरी कार आहे. 1 लिटर पेट्रोलवर ही गाडी 20 किमीचे अंतर कापते, असे सांगितले जाते.