रेल्वेचा प्रवास हा अनेकांसाठी रोमांचक असतो. रेल्वे प्रवासाची मजा काही औरच असते. रेल्वे प्रवासाला वेळ लागत असतो. पण कधीकधी रेल्वेगाड्यांमधून होणारा प्रवास हा आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक मोठा असतो. काही रेल्वेगाड्यांमधील प्रवास पूर्ण करण्यासाठी तास नव्हे तर अनेक दिवस लागत असतात.
पॅलिफोर्निया जेफर
पॅलिफोर्निया जेफर ही अमेरिकेतील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. शिकागो ते सॅन फ्रान्सिको या शहरांदरम्यान ही रेल्वे धावते. 3 दिवसात ही रेल्वे जवळपास 3,920 किलोमीटरचे अंतर कापत असते.
विवेक एक्स्प्रेस
विवेक एक्स्प्रेस भारताच्या ईशान्य भागातून दक्षिणेकडे प्रवास करते. या काळात दिब्रूगड, आसाम, कन्याकुमारी आणि तामिळनाडूत ही रेल्वे पोहोचते. म्हणजेच या रेल्वेमधून तुम्ही देशातील वेगवेगळी दृश्यं आणि संस्कृती अनुभवू शकता. 4 दिवसांत सुमारे 4,154 किलोमीटरचे अंतर पार करणारी ही रेल्वे 57 स्थानकांना पार करते.
इंडियन पॅसिफिक
ऑस्ट्रेलियातील पर्थ ते सिडनी हा प्रवास इंडियन पॅसिफिक चार दिवस आणि 3 रात्रीत पूर्ण करते. ही रेल्वे अॅडलेडच्या कुक आणि ब्रोकन हिल्स या शहरांमध्येही थांबते. ही रेल्वे 4 दिवसांमध्ये 4,352 किलोमीटरचे अंतर कापत असते.
द पॅनेडियन
ही रेल्वेगाडी चार दिवसात स्वत:चा प्रवास पूर्ण करते. या रेल्वेमध्ये बसून तुम्ही पॅनडाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. टोरंटो ते व्हँकुव्हरदरम्यान सुमारे 4,4460 किलोमीटरचे अंतर ही रेल्वेगाडी पूर्ण करते. या रेल्वेगाडीत इकॉनॉमी, स्लीपर प्लस आणि प्रेस्टीज अशा तीन श्रेणीचे डबे असतात.
ट्रान्स सायबेरियन एक्स्प्रेस
ही पृथ्वीवरील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. ही रेल्वे पश्चिम रशियाला देशाच्या पूर्व भागाशी जोडते. 6 दिवसांत ही रेल्वे 9,289 किलोमीटरचे अंतर कापते. ही रेल्वे मॉस्कोहून प्रवास करत व्लादिवोस्तोकला पोहोचते. या रेल्वेमधून प्रवास करणे म्हणजे अविस्मरणीय आनंद मानला जातो, यातील प्रवासादरम्यान विविध दृश्यं, टाइम झोन आणि ठिकाणांचा अनुभव घेता येतो.