ईपीएफओकडे नव्या 14.60 लाख नव्या कर्मचाऱयांची नोंदणी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना काळातील आर्थिक मंदावलेपण आता मागे पडत असून रोजगारांमध्ये समाधानकारक वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) कडे नव्या 14 लाख 60 हजार कर्मचाऱयांची नोंद करण्यात आली आहे. डिसेंबर 2020 च्या तुलनेत ही संख्या 2.06 लाखांनी जास्त आहे. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये कर्मचाऱयांच्या नोंदणीत 19.98 टक्क्यांची वाढ झाली आहे.
14 लाख 60 हजार नव्या कर्मचाऱयांपैकी 9.11 लाख कर्मचाऱयांनी नोंदणी ईपीएफ अँड एमपी कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे. ही संख्या गेल्या दोन वर्षांमधील सर्वात मोठी आहे. 5.49 लाख कर्मचाऱयांनी आपली नोंदणी काही काळापुरती मागे घेतली होती. तथापि त्यांनी पुन्हा नोंदणी करुन घेतली आहे. तसेच जुलै 2021 पासून ईपीएफओ मधून आपली नोंदणी कायमची मागे घेणाऱया कर्मचाऱयांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. साहजिकच, रोजगारात वाढ होऊ लागली असल्याचीही ही महत्वाची चिन्हे आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे.
तरुणांची संख्या मोठी केवळ कर्मचाऱयांची संख्या वाढली आहे असे नव्हे, तर नोंदणी करणाऱया तरुण कर्मचाऱयांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. 22 ते 25 या वयोगटातील कर्मचाऱयांची नोंदणी वाढली आहे. या वयोगटातील 3.87 लाख नव्या कर्मचाऱयांनी नोंदणी केली आहे. तर 18 ते 21 या वयोगटातील 2.97 लाख नव्या कर्मचाऱयांची नोंदणी डिसेंबर 2021 मध्ये झाली आहे. मोठय़ा संख्येने नूतन कर्मचारी (फर्स्ट टाईम जॉब सीकर्स) संघटीत