45 वयोगटातील 300 पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण
प्रतिनिधी/ सातारा
रविवारी रात्री जिह्यात 13 हजार 750 कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झाले. यामुळे 45 वर्षापुढील लोकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात लस घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच कस्तुबा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र गोडोली येथे लसीकरण करण्यात आले. सोमवारी 300 पेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या वतीने माहिती देण्यात आली.
गेल्या तीन दिवसांपासून जिह्यात लसीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. मात्र रविवारी रात्री लसीचा साठा उपलब्ध झाला. सोमवारी सकाळी यांची माहिती मिळताच 45 वर्षापुढील लोकांनी जिल्हा शासकीय रूग्णालय, कस्तुबा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र गोडोली येथे गर्दी केली. कोविशिल्ड लस उपलब्ध असून फक्त पहिला डोस देण्यात आला. यामुळे दुसऱया डोस घेण्यासाठी आलेल्यांना यांची माहिती देण्यात आली. दुसरा डोसचा कलावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे काही लोकांचे 84 दिवस पूर्ण झाले नव्हते. त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली नाही. सोमवारी 300 पेक्षा जास्त लोकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयातून देण्यात आली आहे.