वृत्तसंस्था/ ग्रेनेडा
सोमवारी येथे खेळविण्यात आलेला ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील रियल बेटीस आणि ग्रेनेडा यांच्यातील थरारक सामना 2-2 असा गोलबरोबरीत राहिला.
रियल बेटीसचे खाते 29 व्या मिनिटाला कार्लोस फर्नांडीझने उघडले. मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना रॉबर्टो सोलडॅडोने बेटीसचा दुसरा गोल केला. सामन्यातील 84 मिनिटापर्यंत रियल बेटीसने ग्रेनेडावर 2-0 अशी आघाडी राखली होती पण शेवटच्या पाच मिनिटाच्या कालावधीत ग्रेनेडाने दोन गोल नोंदवून हा सामना बरोबरीत सोडविला. 85 व्या मिनिटाला सर्जीओ कॅनेलेसने तर 88 व्या मिनिटाला ख्रिस्टेन टेलोने गोल नोंदवित ग्रेनेडाला बरोबरी साधून दिली. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात ग्रेनेडा 29 सामन्यांतून 42 गुणांसह आठव्या तर रियल बेटीस 34 गुणांसह 13 व्या स्थानावर आहे.