मुंबई
शेअर बाजारातील लॉरस लॅब्स कंपनीचा समभाग सध्या चांगलाच चर्चेत राहिला आहे. कारण या समभागाने समभागधारकांना वर्षभरातच एक नव्हे शंभर नव्हे तर चक्क 500 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे. 29 जून 2020 रोजी कंपनीचा समभागाचा भाव 103.58 रुपये इतका होता. तो आज 683.40 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच जवळपास या समभागाने 559 टक्के दमदार तेजी दर्शवली आहे. म्हणजे ज्यांनी वर्षामागे शेअर खरेदी करून 5 लाख गुंतवले आहेत, त्यांना केवळ वर्षातच 32 लाख रुपये मिळाले आहेत.