स्पर्धा फक्त बेळगाव शहरासाठी मर्यादित
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. पुरस्कृत ‘लोकमान्य दीपावली किल्ला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाची जाण व्हावी या उद्देशाने लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्राच्यावतीने किल्ला स्पर्धा आयोजित केली जाते. यावषीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
शालेय विद्यार्थी, युवक मंडळे, गणेश मंडळे व सामान्य नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा किल्ला करता येईल. किल्ल्याचे नाव, प्रकार व त्यावरील ऐतिहासिक प्रसंग नमूद करणे आवश्यक आहे. महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र किल्ला स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 2 नोव्हेंबरपासून अर्जांचे वितरण सुरू केले आहे.
10 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धकांना आपली नावे नोंदविता येणार आहेत. ही स्पर्धा फक्त बेळगाव शहरासाठी मर्यादित आहे. लोकमान्य सोसायटीचे छापील अर्ज ग्राहय़ धरले जातील. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम असेल. लोकमान्य सोसायटी, भाग्यनगर शाखा, दुसरा क्रॉस, टिळकवाडी (फोन 2407062), कोरे गल्ली, शहापूर शाखा (फोन 2407062), लोकमान्य सोसायटी, कोनवाळ गल्ली (फोन 2407076), हरिमंदिर रोड, वडगाव (फोन 2407056), लोकमान्य सोसायटी, क्लब रोड (फोन 2407057) या ठिकाणी नावनोंदणी करावयाची आहे.
अधिक माहितीसाठी उमेश कासेकर (9353012002), सतीश गोडसे (9353012003), राजू नाईक (9845427100), सचिन नाडगौडा (8088974209) या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.