प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीच्या महाद्वार रोड शाखेचे नव्या जागेत स्थलांतर करण्यात आले. कपिलेश्वर मंदिर रोड येथील डॉ. अजित कुलकर्णी यांच्या जुन्या दवाखान्याच्या परिसरात नवी शाखा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवार पासून या नवीन शाखेचे कामकाज सुरू करण्यात आले.
लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या लोकमान्य सोसायटीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व दिल्ली राज्यात आपला विस्तार वाढविला आहे. त्यामुळेच देशातील एक अग्रगण्य सहकारी संस्था म्हणुन सोसायटीची ओळख आहे. महाद्वाररोड येथील जुनी शाखा पहिल्या मजल्यावर असल्यामुळे ज्ये÷ ग्राहकांना येण्या-जाण्यास समस्या येत होत्या. त्यामुळे कपिलेश्वर रोड परिसरातील दत्त स्मृती इमारतीत ही शाखा स्थलांतरीत करण्यात आली आहे. शुक्रवारी नव्या इमारतीत लक्ष्मी पुजन करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, सुबोध गावडे, विभागीय व्यवस्थापक एम. एन. कुलकर्णी, सहाय्यक विभागिय व्यवस्थापक सी. आर. पाटील, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना विभागीय व्यवस्थापक एम. एन. कुलकर्णी म्हणाले, ग्राहकांनी दिलेल्या आजवरच्या पाठिंब्यामुळे सोसायटीने सहकार क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. 2015 मध्ये महाद्वाररोड येथे शाखा सुरू करण्यात आली होती. ती शाखा आता नव्या जागेत ग्राहकांच्या सेवेत सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखा व्यवस्थापक शिरीष परब यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक शाखा व्यवस्थापक विना कावळेकर, लेखा अधिकारी वैभव पवार, प्रिती खासनिस, रोहिणी कुरंगी, निलेश बस्तवाड, अमित पवार, किशोर हळदणकर, उत्तम शिंदे, राजु भातकांडे, किसन लाड, गुरूप्रसाद तंगणकर यासह सोसायटीचे ग्राहक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.