प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवार 62 केंद्रावर सुरळीत पार पडली. या परीक्षेला 19199 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 15520 विद्यार्थी उपस्थित होते. तर 3679 विद्यार्थी अनुपस्थित होते.
अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली. परीक्षार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. या परीक्षेसाठी 100 प्रश्नांसाठी 100 गुण होते. काही विद्यार्थ्यांना पेपर अवघड तर काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला. ज्यांना पेपर सोपा गेला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.