प्रतिनिधी/ बेळगाव
वडगाव येथील बाजार गल्ली बंद केल्याने समस्या निर्माण झाली आहे. ज्या परिसरात कोरोना रुग्ण आढळला आहे, तो परिसर बंद करण्याऐवजी मुख्य बाजारपेठेची गल्ली बंद केल्यामुळे त्याचा परिणाम या परिसरातील व्यावसायिकांवर झाला आहे. तेव्हा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन ही गल्ली खुली करावी, अशी मागणी होत आहे.
या गल्लीला लागून असलेल्या अनेक परिसरात बॅरिकेड्स अडवणूक केली आहे. त्यामुळे ये-जा करणेदेखील अडचणीचे झाले आहे. तेव्हा बाजार गल्ली खुली करावी, अशी मागणी होत आहे.