गोडोली / प्रतिनिधी
शिवसेनेचे पश्चिम औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल अपशब्द वापर केल्याबद्दल त्याचा जाहीर निषेध आणि फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सातारा जिल्हा ग्रामसेवक युनियनने केली आहे.
गावोगावी ग्रामविकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रामसेवकांचा कर्तव्याचा आदर करण्याऐवजी पश्चिम औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल वाचाळ बोलून अवमान केला आहे. यांच्या निषेधार्थत राज्यभर पडसाद उमटले असून या आमदारांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामसेवक युनियन आक्रमक झाल्या आहेत. सातारा जिल्हा ग्रामसेवक युनियन ( डि.एन.ई १३६)च्या वतीने उप जिल्हाधिकारी (निवासी) सुनील थोरवे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार फडतरे, जिल्हा सरचिटणीस अभिजित चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष रमेश साळुंखे, गोविंद माने, ग्रामसेवक पतसंस्था व्हाईस चेअरमन डी.डी.गायकवाड,जिल्हा सहसचिव संदीप सावंत, राज्य कौन्सिलर दिगंबर सुरवसे, ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक दिनेश काशीद, सातारा तालुका अध्यक्ष मोहन कोळी, तालुका सचिव संजय यादव, खंडाळा तालुका सचिव शिवाजी यादव ,सातारा तालुका उपाध्यक्ष अरुण कुंभार, प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्रीम.सुचित्रा मस्के,ग्रामविकास अधिकारी व्ही.एम. चव्हाण,सुप्रिया भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.